गेल्या काही दिवसात सगळ्यांनी हस्ताक्षरावरून स्वभाव (Handwriting Analysis) कसा समजू शकतो यावर हजारो प्रश्न विचारले मग विचार केला या महिन्यात कुठल्या अक्षरामधून काय समजत, आम्ही या हस्ताक्षर विज्ञानाचा (Graphology) कसा उपयोग करतो आणि यातील मुख्य संकल्पना काय हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करावा.
मानसशास्त्रामध्ये (Psychology) स्वभावातील गुणधर्म, वैशिष्ट्य समजून घेऊन त्यावर काम करण्यासाठी अनेक पद्धती आहेत. त्याचपैकी Graphology ही एक वैज्ञानिक पद्धत. मानसशास्त्रामधील हस्ताक्षरावरून स्वभाव समजून घेणं ही सगळ्यात पटकन होणारी चाचणी आहे असं आपण म्हणू शकतो.
तर कागदावर लिहिल्या नंतर स्वभाव 2 पद्धतीने समजून घेता येतो.
- कागदाकडे लांबून नजर टाकून स्वभाव समजून घेणं
- a-z अक्षरांकडे तपशीलवार पाहून स्वभाव पडताळून पाहणं.
आज आपण कागदाकडे पाहून स्वभावाचा येणारा एक आढावा कसा कळेल ते पाहूया. यात मी 3 गोष्टींबद्दल बोलणार आहे.
- समास (Margins in Graphology)
- अंतर (Spacing in Graphology)
- अक्षरांखालील दृश्य किंवा अदृश्य रेघ (Baseline in Graphology)
मी इथे जे काही लिहिणार सांगणार आहे ते एकाच दृष्टिकोनातून आणि ठराविक प्रमाणातच तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतीये जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल अक्षरावरून स्वभाव कसा समजून घेता येतो! यात अनेक पैलू आणि वैशिष्ठ्ये अजून असतात. तुमच्यासाठी खास काही tips:
मुळात आपण कागद पेन घेऊन लिहायला बसायचा मूळ उद्देश हा असतो की आपले विचार समोरच्या पर्यंत पोहोचावेत. जर कागदावर स्पष्ट, सुवाच्य अक्षरात लिहिले असेल तर त्या व्यक्तिमत्व बद्दलही आपण तसेच म्हणू शकतो. बऱ्यापैकी स्वच्छ व्यक्तिमत्व! खोलात गेल्यावर बाकीचं कळतंच. ज्या लोकांचं सुवाच्य अक्षर नसतं, अश्या व्यक्तींना समजून घेण्यासाठी केलेला हा प्रयत्न.
लिहिलेल्या कागदावर एक नजर टाकल्यावर पानाच्या डाव्या बाजूला भूतकाळातील प्रत्त्येक गोष्ट आणि स्वतः बद्दल सांगता येतं. यात पालकांशी असलेलं नात, आपली मानसिकता, बालपण अश्या अनेक गोष्टी कळतात. तर उजव्या बाजूला भविष्यात येणाऱ्या आव्हाहनांना कसे पेलताय आणि इतरांना कसे वागवता हे खोलात जाऊन समजून घेता येत. यात तुमची ध्येय, आत्मविश्वास आणि अनेक गोष्टी पाहता येतात.
- समास:
कागदावर लिहिल्यावर चारही बाजुंनी एक समास सोडलेला असतो. यात अंतर सोडण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. त्यावरून व्यक्तीचा स्वभाव ठरतो. समासावरून (margins) माणसाच्या संवाद साधण्याच्या कौशल्यांवर (interaction with other people) आणि कशा पद्धतीने आपण जगतोय यावर लक्ष केंद्रित केलं जातं. यात डावी कडे, उजवीकडे, वर आणि खाली सोडलेल्या अंतरासाठी वेगळे अर्थ असतात. काही लोक कितीही मोठे झाले तरीही आई-वडीलांवर अवलंबून असतात. जगासमोर एकटं, असुरक्षित वाटतं अश्या लोकांना.. सगळी काम स्वतःची स्वतः करतही असतील कदाचित पण सतत कोणाचा तरी आधार लागतो; तर काही लोकं जन्मतःच धडाडी असतात. Risks घ्यायला त्यांना आवडत आणि स्वावलंबी व्यक्तिमत्व असतं!अश्या काही लोकांना समजून घेण्यासाठी या काही टिप्स: डावीकडे सोडलेल्या margin कडे पाहिल्यावर हे 3 प्रकार दिसतात.

1. पाहिल्यावर लक्षात येते की असं लिहिणारी व्यक्ती घरच्यांशी खूप connected आहे. ती इतरांवर अवलंबून आहे.
2.या व्यक्ती घरच्यांपासून भावनिक रित्या दूर जात आहेत अस समजतं
3.या प्रकारची लोकं समोरच्या व्यक्तीला, परिस्थितीला कुशलतेने हाताळू शकतात. इथे मग त्यांना खोट बोलावं लागलं तरी ते पुढेमागे पाहत नाहीत.
अश्या प्रकारे उजवीकडे, डावीकडे, वर आणि खालच्या margins वर काम करून त्या व्यक्तीची personality समजते.
- अंतर:
काही लोक खूप काम करतात, अनेक parties ला जातात, स्वतःच्या छंदांना वेळ देतात थोडक्यात सगळंच करताना दिसतात.. आपण नेहमी विचार करतो कसं काय जमत असेल हे? त्याचं उत्तर लिहिलेल्या कागदाकडे पाहिल्यावरच कळतं. समान अंतर सोडून, भरपूर गोष्टी, एकमेकांमध्ये न अडकता जर लिहिलेल्या असतील तर ती व्यक्ती वरील वर्णनाप्रमाणे असते!
दोन ओळी, शब्द आणि अक्षर यामध्ये कमी, जास्त किंवा असमान अंतर आहे हे पहाताच क्षणी जाणवतं. या अंतर सोडण्यावरून व्यक्तीचं नियोजन आणि त्या नियोजनाची होणारी अंमलबाजावणी (planning and execution) पाहता येते. त्याची विचार करण्याची पद्धत कळते.

a. दोन ओळींमध्ये एकसारखे अंतर-: नियोजन आणि त्यांची अंमलबजावणी उत्तम
b. दोन ओळींमध्ये जास्त अंतर-: नियोजन करायला आणि ते आमलात आणायला खूप वेळ लागतो.
c. दोन ओळींमध्ये असमान अंतर-: बालपण खराब गेल असण्याची शक्यता. आत्मविश्वासाची कमतरता. या व्यक्तींमध्ये नियोजन करण्याची आणि त्याची अंमलबजावणी करण्याची क्षमता कमी पडते.
याच प्रमाणे शब्द आणि अक्षरांमधील सोडलेल्या अंतरामधून स्वभाव कळतो. प्रत्येक stroke मधून वेगळे गुणधर्म कळतात.
- ओळ, Baseline:
ज्या रेघेचा आधार घेऊन आपण लिहितो (दृश्य किंवा अदृश्य रेघ) ती कशी जातीये त्यावरून स्वभाव ओळखता येतो. यावरून आपल्याला स्वतःवरचा control कळतो. या पेक्षा खोलात जाऊन समजून घ्यायचे झाले तर baseline ही अनियंत्रित असली तरीही खूप महत्त्वाची असते व्यक्तीला समजून घेण्यामध्ये. ज्या घटनांवर व्यक्तीमत्व उभे असते त्या आधारस्तंभाचे चित्रीकरण baseline आपल्या समोर करते. यामुळे माणसाला सत्य परिस्थिती ची असलेली जाणीव समजते. नाती सांभाळण्याचे कौशल्य आणि सर्व भावना एकत्रितपणे तरीही स्पष्ट तुम्हाला मांडता येतात का हे या baseline मधून कळते! फारच पुढचा विचार सांगायचा झाला तर baseline ही सत्य परिस्थिती काय आणि सुप्त मनामध्ये नक्की काय चाललंय याची विभागणी करून आपल्यासमोर मांडते.

i) वर जाणारी ओळ:
असं लिहिणारी लोकं उत्साही, आनंदी, नेहमी काहीतरी चांगलं होईल असा विचार करणारी, आशावादी, कष्टाळू असतात.
ii) खाली जाणाऱ्या ओळी:
या लोकांमध्ये कमी उत्साह असतो. आळशी असतात असही म्हणू शकतो आपण. खिन्न मनस्थिती मध्ये असतात आणि अश्या लोकांच्या आयुष्यात त्यांना न आवडणाऱ्या बऱ्याच गोष्टी होत असतात. लहान मुलांमध्ये किंवा मोठ्यांमध्ये हे दिसत असेल तर त्यांना बोलतं करण्याची गरज असते. सहसा अश्या व्यक्तीला मनातलं व्यक्त केल्याने मदत होते. काही जणांसाठी हा आयुष्यातला तात्पुरता टप्पा असू शकतो जिथे मदतीची गरज असते. अथवा हे लोक आळशी प्रकारात मोडतात..
लांबून नजर टाकल्यावर कागदावर वरील गोष्टी कळतात तसेच या खालील काही गोष्टी पण कळतात ज्यावर मी पुढच्यावेळी लिहीन. पुढे काय असेल याचा साधारण अंदाज, बघा intersting वाटतंय का…
- अक्षरे उजवीकडे किंवा डावीकडे कुठल्या बाजूला कललेली असतात हे समजून घेणं
- किती दाब देऊन तुम्ही कागदावर लिहिता हे पहिले जाते. त्याबद्दल माहिती.
- अक्षरांची जोडणी कुठल्या पद्धतीने होतीये त्यावर स्वभाव कळतो.
- अक्षराच्या आकारावरूनही स्वभाव कळतो!
वर नमूद केलेली माहिती खूप थोडकी आहे. (Tip of iceberg). व्यक्तिमत्व परीक्षण करण्यासाठी तपशीलवार अभ्यास करणे गरजेचे असते. Graphology हा विषय सामान्य लोकांपर्यंत पोहोचावा आणि त्यांना या बद्दल माहिती मिळावी म्हणून मी हे article लिहिले आहे. यातील खोलवर माहिती मिळवण्यासाठी तज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
अथवा contact: 8806222779 भाग्यश्री.
या आणि अश्या अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी वाचत राहा आणि मला feedback देत राहा! मला तुमची प्रत्युत्तर वाचायला नक्कीच आवडेल.
Pingback: अक्षरे संगती स्वभाव ! (Details about Slant - Graphology) | Graphology
Pingback: Drawing Analysis-decode your subconscious mind | Graphology