अक्षरे सांगती स्वभाव ! (Details about Slant – Graphology)

Long weekend संपत आला आहे so विचार केला routine चालू व्हायच्या आधी तुम्हाला अजून थोडं graphology बद्दल सांगावं. मागच्या वेळी आपण margins, spacing आणि baseline बद्दल वाचलं. या लेखात आपण slant बद्दल समजून घेऊ.

Slant in Graphology मला वाटत माणसाला समजून घेण्यामध्ये त्याच्या क्रिया-प्रतिक्रिया समजून घेणं आणि त्यामागे अडकलेली भावनांची गुंतागुंत लक्षात घेणं गरजेचं असतं. ‘भावनिक गुंता’ ऐकूनच जड वाटतं तर ते समजून घेऊन सोडवायला जाणं तर फारच अवघड! काळजी करू नका, व्यक्तित्वामधील अवघड गोष्टी समजून घेण्यासाठीच तर मानसशास्त्र आहे. आणि graphology हा एक त्यातलाच भाग. व्यक्तीच्या भावना हा एक अविभाज्य भाग असतो माणसाचा. आणि त्या भावना आपण व्यक्त कशा करतो यावर त्याचं व्यक्तीमत्व अवलंबून असत. आपण आनंदी आहोत की दुःखी आहोत हे मनात ठेवणारे काही लोक असतात तर काही लोक पटकन बोलून टाकतात. काही जणांना या भावना स्वतःपाशीच ठेवायच्या असतात तर काहींना स्वतःहून सांगायच्या असतात, त्यांना लक्ष वेधून घ्यायचं असत.

आपले आचार आणि विचार हे व्यक्तिमत्वाचा पाया असतात असं म्हणलं तर वावगं नाही. भावनांमुळे आपण आपल्या आयुष्यातल्या घटनांना आणि माणसांना प्रतिसाद देतो. आपण व्यक्त होतो म्हणजेच आपल्या आतल्या आवाजाला बाहेरच्या जगपर्यंत एका पुलावरून चालत जायला मदत करतो.

आता या भावना माणूस व्यक्त कशा करतो ते आपण अक्षरामधून पाहू शकतो. ते असं:

अक्षरे उजवीकडे किंवा डावीकडे कुठल्या बाजूला कललेली/ झुकलेली असतात यावरून तुम्ही व्यक्त कसे होता हे समजतं. जितकी उजवीकडे कललेली अक्षरे असतील तेवढी त्या व्यक्तीचा भावनिक प्रतिसाद देण्याची क्षमता जास्त असते.अक्षरे जितकी मागे, डावीकडे कललेली असतील तेवढा माणूस अलिप्त राहण्याचा जास्त प्रयत्न करतो. सहसा लवकर व्यक्त होत

Graphology Slant
Types of Slant in Graphology
Graphology
Right & Left Slant in Graphology

AB slant:

Graphology
AB Slant

साधारण 90° मध्ये अक्षर असतील तर त्या व्यक्ती तर्कशुद्ध (logical) असतात.अश्या लोकांचा स्वतःच्या भावना व्यक्त करण्यावर खूप ताबा असतो. सहसा ते भावना पटकन व्यक्त करत नाहीत. खूप क्वचितच त्यांच्या भावना निर्णय घेण्यामध्ये येतात. सहसा त्यांचे निर्णय हे logical जास्त आणि भावनिक कमी असतात. हे शांत स्वभावाचे असतात. कुठलाही निर्णय घ्यायच्या आधी ते सगळ्या शक्यतांचा विचार करतात. या व्यक्ती योग्य की अयोग्य, यातून पैसे मिळतील का, आपल्या निर्णयाचे परिणाम काय होतील; असा सारासार विचार करून निर्णय घेतात. या व्यक्तींना भावना असतात पण त्या व्यक्त करण्यावर त्या खूप नियंत्रण ठेवतात.

Any Rightward slant:

Graphology

उजवीकडे झुकलेली अक्षर (Right Slanted Handwriting) असतील तर व्यक्ती खूप बोलकी असते. तिला इतरांना मदत करायला आवडतं. स्वतःचा आतला आवाज ऐकून ते react होतात. त्यांचे निर्णय हे भावनांवर आधारलेले जास्त असतात. भावनावश व्यक्ती असतात या. त्यांना संवाद साधण्याची गरज वाटते. भावना व्यक्त करण्याची आवश्यकता असते. अक्षरे जेवढी जास्त उजवीकडे झुकलेली असतील तेवढी ती व्यक्ती जास्त भावनावश असते. या लोकांना अभिप्राय महत्वाचा वाटतो. इतर कोणी अभिप्राय दिल्यावर हे खुश होतात! उजवीकडे झुकलेल्या प्रमाणावरून याचे BC, CD, DE, E+ असे प्रकार आहेत. या मध्ये बाकीची अक्षरे पाहणे पण तेवढेच महत्वाचे असते. हा लेख एक मार्गदर्शक म्हणून लिहिलेला आहे. यात खोलात जाऊन अजून खूप अभ्यास असतो, तो संपूर्ण अभ्यास एकत्रित करून मगच आपल्याला personality describe करता येते. Slant किंवा मागच्या लेखातील माहिती ही खूप मूलभूत आहे!!

Any leftward slant:

Graphology
Left Slant

डावीकडे अक्षर (Left Slanted Handwriting) झुकलेल्या व्यक्ती या स्वतःला व्यक्त होण्यापासून थांबवतात. अश्या व्यक्ती नेहमी स्वतःच्या संरक्षक गरजांवर जास्त लक्ष केंद्रित करतात. खूप काळजीपूर्वक वागतात. अश्या व्यक्तींमध्ये भीती किंवा स्वार्थ या भावना जास्त असण्याची शक्यता असते. बाकीच्या अक्षरांबरोबर हे जुळवून पाहावे लागते. या व्यक्तीनी स्वतःच एक कवच बनवलेलं असत त्या मध्ये त्या आनंदी असतात. दुसऱ्यांपेक्षा यांना स्वतःमधून, आतून प्रेरणा मिळते. यांनी भावना दाबून ठेवलेल्या असतात मनामध्ये. अक्षरे जितकी मागे झुकलेली असतील तेवढी जास्त मानसिक भीती लोकांना असते. जितकं अक्षर मागे झुकलेलं तेवढं भावनिक सहभाग कमी असण्याचा प्रयत्न असतो. यामध्ये अक्षर किती मागे झुकते त्यावरून FA आणि G असे प्रकार आहेत.

हे वाचल्यावर आपल्याला प्रश्न नक्कीच पडू शकतो की माझं अक्षर नेहमीच बदलत, माग मी कसा आहे? तर सहसा slant बदलत नाही. भावनिक चढउतार, जवळच्या व्यक्तीचं जाणं, किंवा खूप खोलवर रुतेल अशी एखादी घटना झाली तरच slant बदलते.

ज्या लोकांची slant सहसा एकसारखीच राहते अश्या लोकांच्या आयुष्यात भावनिक स्थिरता असते. लोकांशी वागण्यामध्ये फारसे बदल नसतात.

काही लोकं 2-3 प्रकारच्या slants मध्ये लिहितात. ह्या लोकांना निर्णय घेण्यामध्ये त्रास होतो कारण नेहमीच त्यांचं मन एक सांगत असत आणि बुद्धिमत्ता काहीतरी वेगळं सांगते. Logically निर्णय घ्यायचा का emotionally या कोड्यात अडकलेले असतात हे. अश्या लोकांना असुरक्षित वाटायला लागलं तर ते एकदम बंद होतात. बऱ्याचदा बोलता बोलता ते विषय सोडून देतात आणि शरण जाऊन विषय बंद करण्याचा प्रयत्न करतात. हे सुद्धा बाकीच्या अक्षरांबरोबर तपासून पाहणे गरजेचे असते.

व्यक्तीच्या मनातल्या भावना वाचायला शिकायचं असेल तर तुम्हाला या ‘slant’ बद्दल अजून खोलात जाऊन पाहावं लागेल. मदत लागली तर मी आहेच!

तुमच अक्षर इथे पोस्ट करा आणि तुम्ही सांगा slant कुठला? मी चूक की बरोबर सांगीन! करून तर पाहूया जमतंय का तुम्हाला अक्षरावरून स्वतःला समजून घ्यायला…

 Reference:

Hayes Reed C,  1993; Between the lines: understanding yourself & others through Handwriting analysis; Your slant on Life .

This Post Has 2 Comments

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu