Know How to Face Challenges from Handwriting

Graphology म्हणजे अक्षरावरून स्वभाव समजून घेण्याचा एक सोप्पा मार्ग. अक्षरावरून स्वभाव समजून घ्यायचा म्हणजेच handwriting analysis करून काही ठराविक लिहिण्याच्या पद्धती समजून घ्यायच्या. ज्यांना हे विज्ञान समजते आणि वापरता येते त्यांना graphologist म्हणतात. मी भाग्यश्री वारके (Bhagyashree Warke) आज तुम्हाला याच विज्ञानातील zones बद्दल माहिती सांगणार आहे. येणारी रोजची, वैचारिक तसेच शारीरिक आव्हाने आपण  कशी पेलू शकतो हे Zones मधून समजते. तुम्हाला हे शिकण्यासाठी (Learn graphology) खालील लेखाचा अभ्यास करण गरजेच आहे.

आपण आज graphology मधील अजून एक महत्त्वाचा घटक पाहूया. त्यासाठी आधी काही महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊ. आपण 3D जगात राहतो ज्यात उंची, रुंदी आणि खोली याला महत्त्व असते. या तिन्ही बाबी आपल्याला अक्षरामधूनही दिसतात. उंची ही उभ्या dimension मधून समजते म्हणजेच वर आणि खाली जाणाऱ्या प्रत्येक stroke मधून हे vertical dimension समजू शकते.

या लेखामधील महत्वाचे मुद्दे :

Dimensions of a Letter

१. Vertical dimension (उंची):

Height of Letter
Verticle Dimension

इथे अक्षरे ज्या पद्धतीने वर आणि खाली जातात त्या stroke formation ला vertical

dimension म्हणू शकतो.

 

२. Horizontal dimension (रुंदी):

Width of Letter
Horizontal Dimension

आपण नेहमी लिहिताना डावीकडून उजवीकडे लिहित जातो. या अक्षरे आडवी लिहिण्याची आपण रुंदीशी तुलना करू शकतो आणि याला horizontal dimension म्हणता येऊ शकते.

 

३. Depth of writing, pressure (अक्षराचा दाब)

Pressure of Writing
Depth of Writing

आपण लिहिताना किती दाब पडतो यावर तिसरे dimension अवलंबून असते. याला इंग्लिश मध्ये Pressure असे म्हणतात. काही लोक कमी दाब देऊन लिहितात तर काहींचा जास्त असतो. आपल्याला ते पाहून समजू शकते. या GIF मध्ये दाखवल्याप्रमाणे हे 3rd dimension म्हणता येईल.

आता या 3Ds पैकी एक ‘D’ समजून घेऊया. कुठलेही अक्षर लिहिताना खाली आणि वर जाणारा stroke असतोच. तेच strokes विभागून त्यांचं विश्लेषण केलं की काही प्रमाणात vertical dimension समजू शकतात.

Zones in Handwriting:

 हस्ताक्षर हे 3 मुख्य भागांमध्ये विभागले गेले आहे. प्रत्येक भाग हा व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू दर्शवतो. आपण लहान असताना 4 रेघी वह्यांमध्ये लिहायला शिकलो. ते आठवलं तर आपण 3 भागांमध्ये लिहायला शिकलो होतो.  

Handwriting Zones

या 3 भागांपैकी वरच्या भागात येणारी वळणं, कुठल्याही अक्षराचा गरजेसाठी किंवा गरज नसताना वरच्या टप्प्यात झालेला विस्तार आणि कॅपिटल अक्षरं ही Upper zone मध्ये (वरच्या टप्प्यात) येतात. 

Upper Zone

उदा. small letters: b, d, f, h, k, l, t; गरज नसताना d सारखी वर गेलेली a ची रेष इत्यादी. Middle zone मध्ये ( मधल्या टप्प्यात) lowercase letters म्हणजेच छोट्या लिपी मधली अक्षर येतात. 

Middle Zone

उदा. a, c, e, i, m, n, o, r, s, u, v, w, x, z इत्यादी. आणि lower zone मध्ये खालील भागात येणारी वळणं, अक्षरांचा खाली झालेला विस्तार येतात. 

Lower Zone

उदा. g,j, p, q, y.

या 3 भागांमध्ये आपल्या शरीराचा मानेपासून वरचा भाग हा UZ मधून दिसतो. मान ते कंबरेपर्यंतचा भाग हा MZ मध्ये दिसतो आणि कंबरेपासून खालील भाग हा LZ मधून दिसतो.

Zone
Body Zones

Body Zones

या 3 झोन्स ची विभागणी आपण मन, आत्मा आणि शरीर अशी करू शकतो. किंवा मानसशास्त्र तज्ञ सिगमंड फ्रॉइडनी म्हणल्याप्रमाणे  superego, ego आणि id असाही याचा उल्लेख होऊ शकतो. या झोन्स कडे अनेक दृष्टिकोनातून पाहता येते. काही जण याचा upper zone म्हणजे अध्यात्मिक, lower zone दुष्ट प्रभाव आणि middle zone म्हणजे माणुसकी असा उल्लेख करतात. zones मधून वेळ, जागा, शरीराची विभागणी आणि भौतिक जगाची जाणीव अश्या बद्दलही माहिती कळते. यात बऱ्याचशा theories मांडलेल्या आहेत आणि सगळ्यांमध्ये एक प्रकारचं साम्य आढळत.

सगळ्या theories? (सिद्धांतांकडे) पाहता प्रत्येक झोन मधून एकंदर खालील गोष्टी समजतात.

Upper zone:

एकंदर आपल्या मानसिक स्थितीचा गोषवारा, जो अस्तित्वात नसतो पण अनुभवता येतो. यात सगळ्याच गोष्टी येतात. कल्पनाशक्ती, मनाचा आवाका, बुद्धिमत्ता, स्वतःच्या मनात करून घेतलेले समाज, संकल्पना बद्दलची स्पष्टता, अवती-भोवतीची जाणीव, इच्छा- आकांक्षा इत्यादी. यातून लेखकाची नैतिकता समजते. आत्मसंयंम कळतो. काही प्रमाणात शरीराचा मानेच्या वरचा भागात चाललेले क्षण कागदावर उमटतात. आपल्या सुप्त मनात चालेल्या moments आपण कागदावर पाहू शकतो. Upper zone मधून व्यक्तीची दूरदृष्टी कळते. 

Middle Zone:

Middle zone मधून अस्तित्वात असलेल्या आणि व्यावहारिक गोष्टीं समजतात. यातून आज, आत्ता बद्दल माहिती मिळते. व्यक्ती समाजात कितपत मिसळते हे समजते. लेखकाचं संवाद कौशल्य मधल्या झोन मधून लक्षात येते. लेखकाची वृत्ती या झोन मध्ये स्पष्ट होते.

Lower Zone:

Lower zone म्हणजेच खाली जाणारा झोन हा भौतिक जगात जगण्यासाठी असलेल्या  गरजा आपल्यासमोर मांडतो. जगण्यासाठी लागणारे पैसे मिळवण्यासाठी आपण किती कष्ट करू शकतो हे समजते. आपल्या शारीरिक गरजा दिसतात. यातून लेखकाची कृती दिसून येते. म्हणजेच काही लोक बोलतात भरपूर पण कृती कमी करतात. अश्या लोकांचा lower zone कमी असण्याची शक्यता जास्त.

 वर सांगितल्या प्रमाणे आपण आयुष्यात येणाऱ्या आव्हानांना कश्या प्रकारे सामोरे जातो हे समजते.  upper zone जास्त असल्यास व्यक्ती वैचारिक पद्धतीने आव्हाने सोडवेल. आणि lower zone जास्त असल्यास व्यक्ती प्रत्यक्ष कृती करण्यावर आणि practical approachनी  आव्हाने सोडवेल. वेळेच्या क्रमातून पाहता upper zone भविष्यकाळात घडणाऱ्या गोष्टींना लेखक कसा प्रतिसाद देईल हे दर्शवतो. Middle zone सद्य स्थिती दर्शवतो आणि lower zone होऊन गेलेल्या गोष्टींचा मनावर झालेला परिणाम दर्शवतो. भौतिक जगाची जाणीव कशी ओळखता येईल पहायचे झाले तर, झाड उदाहरण घेता येऊ शकत. मूळ म्हणजे lower zone, खोड म्हणजे middle zone आणि फांद्यांना upper zone म्हणता येऊ शकत.  

 हे तिन्ही zones balanced असले तर व्यक्तिमत्व दृढ असते. तिला भौतिक गोष्टींमध्ये अति स्वारस्य नसते आणि अध्यात्मिक गोष्टींचा अति पगडाही नसतो. मानसिक शांतता लाभते यांना.. आयुष्यात गरजेच्या गोष्टी ते मन लावून करतात आणि कुठल्या गोष्टीला किती प्राधान्य द्यायचं ते ठरवू शकतात. गरजा आणि इच्छा या ओळखून गरजांवर लक्ष केंद्रित करू शकतात.

 अक्षरामध्ये जर एखाद्या zone वर्चस्व असेल तर त्यासाठी बाकीच्या zones ना तडजोड करावी लागते. जर upper zone मोठा असेल तर सामाजिक आणि कृती करणाऱ्या zone महत्व कमी होऊन व्यक्ती फक्त वैचारिक दृष्टीकोन ठेवते. आयुष्यात वावरताना तिचा सामाजिक आणि भौतिक गरजेच्या गोष्टींशी संबंध कमी होतो ती फक्त वैचारिक वागते

सगळे zones हे baseline शी निगडीत असतात. baseline पासून १:१:१ या प्रमाणात zones असावेत. पण हे असं परिपूर्ण, आदर्श अक्षर खूप कमी लोकांचं असत. सहसा आपण कोणीच अति perfect नसतो. हे handwriting मधून आपल्याला दिसते. 

काही लोक upper zone मोठा लिहितात

Upper Zone
Upper Zone

काही middle zone मोठा लिहितात.

MZ मोठा
Middle Zone

lower zone मोठा लिहिणाऱ्यांचे अक्षर असे काहीसे दिसते. 

Lower Zone

अश्या प्रकारे ज्या व्यक्तीच्या अक्षरामध्ये जो zone मोठा दिसतो त्या प्रमाणे त्याचा स्वभाव असतो. उदा. upper zone मोठा असलेल्या व्यक्ती त्यांची आव्हाने फक्त बुद्धिमत्तेच्या जोरावर सोडवायचा प्रयत्न करतील. lower zone मोठा असलेल्या व्यक्ती फक्त कृती करून आव्हाने सोडवतील.

वर सांगितल्या प्रमाणे आपल्याला zones चा उपयोग व्यक्तीला ला समजून घेण्यात होतो. ते आयुष्यातल्या समस्या कशा सोडवतात हे कळते. हा लेख आवडला, काही प्रश्न असले तर नक्की विचारा. मला मदत करण्यात आनंदच आहे.

Interesting Article : Details about Slants in Graphology

Reference:

 1. Hayes Reed C, 1993; Between the lines: understanding yourself & others through Handwriting analysis; Zonal Distribution and directional trends.
 2. Karen Kristin Amend and Mary Stansbury Ruiz; 1980; Handwriting Analysis, the complete basic book; Zones: The horizontal dimension of movement.

This Post Has 17 Comments

 1. Nice one .
  But couldn’t not understand as it is in Marathi

 2. Something different. Superb..

  1. Thank you 🙂

 3. Good one,
  Quite informative

  1. Thank you very much

 4. It’s very nice & interesting article! Especially very useful for parents as well as Teachers,I think.Interesting to know about handwriting of Abraham Lincoln n Mahatma Gandiji,since we all know these Great Personalities handwriting!

  1. Keep reading

  2. Willl be sharing there analysis in next few days

 5. मस्त लिहिला आहे लेख !!!

  1. Thank you 🙂

 6. Nice one…

  1. Thank you

 7. Nice

  1. Thank you Rashmi 🙂

 8. Nice

  1. Thank you Subodh 🙂

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu