अक्षरे सांगती स्वभाव – Handwriting Size

मी मागच्या लेखात म्हटल्या प्रमाणे आपण अक्षरावरून व्यक्तीचा स्वभाव समजू शकतो पण ती व्यक्ती असं का वागतीये हे समजून अक्षराच्या आकारावरून -Handwriting Size आपण आयुष्यातली प्रत्येक दिवसाची आव्हाने कशी पेलतो ते समजतं.

आकार समजून घेण्यासाठी नक्की कुठल्या अक्षरांचा आकार पाहायला हवा हे लक्षात घेणं घरजेचं आहे. मधल्या पट्यामध्ये (Middle zone) असलेली अक्षरं नेहमी पहावीत. म्हणजेच a, m, n, o अशी अक्षरं पहावीत. सामान्यतः a, o, e, m, n  ही अक्षरं पहिली जातात. यांचा आकार पाहताना खालील 2 पध्दती आहेत.

1. अक्षरांची रुंदी आणि उंची ठरवून.

अक्षरांची उंची व रुंदी पाहता त्याचे 3 प्रकार पडू शकतात.

1.1  उंची व रुंदी एकसमान

Handwriting Analysis by Size
1.1 Same Height & Width

उंची व रुंदी एकसारखे लिहिणारे लोक हे खुपदा  आदर्श जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. तणाव-पूर्ण जीवन हा यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असण्याची शक्यता खूप असते. एक साध उदाहरण सांगायचं तर; काही बायका लाडू करताना प्रत्येक लाडू एक आकाराचा, गोलच असावा असा अट्टाहास धरतात. एखादा लाडू उत्तम गोल झाला नाही तर यांना त्रास होतो. सतत आपण बरोबरच असावं प्रत्येक कामात आपण आदर्श असावं हाच विचार त्यांच्या डोक्यात असतो त्यामुळे एखाद्या वेळी आपल्याकडूनही चूक होऊ शकते हे त्यांना पटतच नाही. प्रत्येक गोष्ट उत्तम करण्याच्या नादात हे लोक तणाव पूर्ण जीवन जगतात.

1.2 उंची जास्त, रुंदी कमी

Handwriting Analysis by Size
1.2 Height more than Width

उंची जास्त व रुंदी कमी असं अक्षर असणारे लोक खूप चपळ असतात. नेहमी पुढाकार घेऊन काम करायला तयार. अगदीच सांगायचं तर झोपलेल्या आणि उभ्या माणसाची तुलना केल्यास उभं असलेला माणूस कामं पटपट काम करू शकतो.

1.3 उंची कमी, रुंदी जास्त

Handwriting Analysis by Size
1.3 Width more than Height

रुंदी जास्त आणि उंची कमी असणारी अक्षरं ही अशी दिसतात. साधारण खाटेवर झोपलेल्या माणसासारखं दिसत हे अक्षर. पसरून बसलेल्या माणसासारखं वाटत! असं अक्षर असलेली लोकं जरा आळशी असतात. रुंदी जितकी जास्त तेवढा आळस जास्त.

हे input फारच कमी आहे. यात अजून detailed बघता व्यक्तित्वाबद्दल पुढील माहिती मिळू शकते..

2. एकंदर अक्षराच्या आकाराची स्वतःच्या अक्षराशी तुलना करून..

सहसा आपला स्वतःचा स्वभाव कसा आहे हे आपल्याला थोड्याफार प्रमाणात नक्कीच माहीत असतं त्यामुळे एक सोप्पा उपाय असा की समोरच्याच अक्षर बघताना आकाराची तुलना स्वतःच्या अक्षरांची करायची म्हणजे सोपं. स्वतःच्या अक्षराच्या आकाराशी तुलना करता आकार पाहिला तर बऱ्याच गोष्टी समजतात. अक्षराचा आकार सांगतो की आपण स्वतःच्या कामाला, दिलेल्या शब्दांना किती महत्त्व देतो.स्वतःबद्दल काय वाटतं, आकारावरून आपल्या नात्यांबद्दल काय वाटतं हे पण समजतं. आपण विचार करून जगणारे- बुद्धीजीवी आहोत की कृती करणारे हे पण अक्षरावरून समजते. आकार पाहताना मागे म्हणल्याप्रमाणे a, o, e, m, n अशी middle zone मधली अक्षरं पहावीत. इंच किंवा 3 मिलिमीटर अक्षराचा आकार हा सरासरी/ मध्यम मानला जातो. Extra large (8 mm पेक्षा जास्त), Large (5-8 mm), Medium (3-5 mm), Small (3 mm पेक्षा कमी), Miniature (2 mm पेक्षा कमी)   अश्या आकारांमध्ये अक्षराचे मोजमाप होऊ शकते.

यापैकी large आणि small हे 2 आकार समजले तरी बाकीचे समजणं सोप्प जातं.

2.1 Large handwriting size (मोठे अक्षर) :

Handwriting analysis by size
Large Handwriting Size

सहसा मोठे अक्षर असणारी लोकं सामाजिक असतात. सगळ्यांशी बोलायला आवडणारी, बरेच मित्र मैत्रीण असलेली असतात. सढळ हाताने खर्च करतात. सगळ्यांना मदत करतात. लोकप्रिय. आत्मविश्वास दांडगा असतो मोठे अक्षर असलेल्या लोकांचा. धीट, धाडसी व्यक्तिमत्व, ओसंडून वाहणारा उत्साह, बोलका स्वभाव, मनातल्या गोष्टी छान मांडणारे, कार्यक्षम असतात. शक्यता आहे की हे सगळे गुण असल्यामुळे बढाईखोर असण्याची शक्यता वाढते. हा बढाई मारण्याच्या स्वभावाची बाकीच्या अक्षरांशी आणि लिखाणाच्या पद्धतीशी तुलना करून खात्री करून घेणं गरजेचं असतं. मोठं अक्षरं काढणारी लोकं स्वतःला तसेच इतरांना महत्त्व देतात. स्वतःची एक वेगळी ओळख बनवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी हे नेहमीच प्रयत्न करतात. एखाद्या गटामध्ये असताना लक्ष वेधून घेणारे हे असतात. कौतुक करून घ्यायला यांना आवडत! (खरंतर सगळ्यांनाच आवडत पण हे लोक कौतुक व्हावं म्हणून जास्त प्रयत्न करतात. बोलून दाखवतात.) एकटं राहणं यांना फारसं जमत नाही. नेहमी कोणी ना कोणी बरोबर असलेलं आवडतं. बऱ्याचदा घाईत असतात. खूप उतावळे म्हणू शकतो आपण. काही वेळा अस्वस्थ असण्याचं प्रमाण जास्त. यांचा दृष्टिकोन व्यापक असतो पण लहान गोष्टींचा खोलात जाऊन विचार, लक्ष केंद्रित करणं, एकाग्रता आणि स्वयंशिस्तीचा अभाव असल्याने खूप कमी लोक त्यांच्या vision वर काम करू शकतात. त्यासाठी लागणारी स्वभाववैशिष्ट्ये आपल्याला वेगळ्या अक्षरामधून पहावी लागतील.

2.2 Small Handwriting Size (छोटे अक्षर):

Handwriting Analysis By Size
Small Handwriting Size

लहान अक्षरं असलेली व्यक्ती विनम्र असते. ह्या व्यक्ती स्वतःचं महत्त्व जाणतात त्यामुळे आत्मनिरीक्षणात्मक असतात. हे सहसा नवीन लोकांशी मनमोकळेपणाने बोलू शकत नाहीत. ह्या लोकांना गर्दीमध्ये सुद्धा स्वतःचा असा वेळ लागतो. पटकन लोकांमध्ये मिसळत नाहीत. बौद्धिक कामाची  यांना जास्त आवड असते पण याची खात्री करून घेण्यासाठी zones पाहणं गरजेचं असतं.

लहान अक्षरं असलेली व्यक्ती किचकट, खूप बारीक, लक्ष देऊन करावं लागणारं काम खूप उत्तम रित्या करते. एकाग्रता भरपूर असते. खूप मोठा दृष्टिकोन नसतो त्यामुळे मोठी vision तुलनेने कमी असते पण मोठ्या गोष्टींसाठी लागणार लहान planning ह्या व्यक्ती मस्त करू शकतात. अक्षर खूपच लहान होत गेल तर त्या व्यक्तीमध्ये न्यूनगंड निर्माण होऊन आव्हानांचा सामना करताना त्यांना खूप कष्ट पडतात. अश्या व्यक्तींना भरपूर प्रसिद्धी आवडत नाही आणि संभाळताही येत नाही.

Handwriting Analysis by Size
Handwriting of Mahatma Gandhi

याला गांधीजी किंवा Einstein सारखे काही लोक अपवाद आहेत ज्यांचं अक्षर लहान असूनही त्यांनी मोठ्या प्रमाणात जनतेवर प्रभाव टाकला. इथे त्यांच्या अक्षरामध्ये confidence, सातत्य, चिकाटी, इतरांना मदत करण्याची वृत्ती या आणि असे बरेच व्यक्तिविशेष गुण दिसतात. त्यामुळे त्यांनी लोकंवर मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकला. 

2.3 मध्यम आकार असलेले अक्षर:

Handwriting Analysis by Size
Medium Handwriting Size

या व्यक्ती विचार आणि काम करणं याचा समतोल राखू शकतात. ह्या व्यक्ती स्वतःला अवास्तव महत्व देत नाहीत किंवा स्वतःला कमीही लेखत नाहीत. या व्यक्ती मोठे आणि छोटे अक्षर असणाऱ्या लोकांमध्ये समतोल राखून ठेवतात.

अक्षर जितकं मोठं होत जाइल तेवढं लेखक स्वतःला गरजेपेक्षा जास्त महत्त्व देत जातो. लेखक जे नाहीये ते सादर करत जातो आणि अक्षर जितकं लहान होत जाईल तेवढा त्या व्यक्तीचा न्युनगंड वाढत जातो.

थोडक्यात extra large आणि miniature ह्या दोन्ही प्रकारांमध्ये large आणि small या स्वभाव वृतींची तीव्रता वाढत जाते.

अक्षरावरून स्वभाव ओळखायला आवडेल? माझे ब्लॉग्स वाचत राहा, comment करा, तुमचे प्रश्न विचारा.. उत्तर द्यायला, तुमच्या शंका निरसन करायला मी आहेच!

 Reference:

  1. Hayes Reed C, 1993; Between the lines: understanding yourself & others through Handwriting analysis; Basics of handwriting analysis.
  2. Karen Kristin Amend and Mary Stansbury Ruiz; 1980; Handwriting Analysis, the complete basic book; Size and spacing.

This Post Has One Comment

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu