Regularity and Irregularity in Graphology

Graphology (Handwriting Analysis) हे विज्ञान आणि कलेचे मिश्रण आहे! प्रत्येकाची स्वतंत्रपणे व्यक्त होण्याची पद्धत ही खूप खोलात जाऊन, चाचणी केल्यावरच निश्चित करता येते. यात तपशीलवार गणती आणि मिळवलेल्या माहितीची व्यवस्थित योजना करणे गरजेचे असते. हे झाल्यावरच व्यक्तीचा प्रमुख व वैशिष्ट्यपूर्ण स्वभाव लक्षात येतो. Graphology चा कलेच्या माध्यमातून विकास होतानाही दिसतो. Graphologist हा निरीक्षणांमधून आणि छोट्या छोट्या सांकेतिक गुणांमधून एक व्यक्तिमत्त्व रेखाटत असतो. म्हणून मला वाटतं, विज्ञान आणि कलेच्या संगमातून एक अचूक व्यक्तिमत्त्व निर्माण होताना आपण प्रत्यक्ष पाहू शकतो. ही व्यक्तिमत्त्व रेखाटण्याची कला, खूप वर्षांच्या अनुभवातून आणि स्वतःला व इतरांना समजून घेण्यातून वाढत जाते.

आज आपण Regularity आणि irregularity म्हणजे काय पाहूया. (म्हणजेच नियमित व अनियमित अक्षर)

एकंदर लांबून कागदाकडे पाहिल्यावर ते एकसारखं लिहिलेलं आहे की त्यात भरपूर बदल होत आहेत हे कोणालाही समजत. या भरपूर बदलांमध्ये आकार कमी जास्त होणं, अक्षरांमधील, 2 ओळींमधील अंतर असमान असणं, अक्षर उजवीकडे किंवा डावीकडे झुकलेलं असणं यासारख्या गोष्टी असतात. यावरून आपण ते नियमित, एकसलग, एकसारखं आहे की अनियमित हे ठरवू शकतो.

उदाहरण द्यायचे झाले तर नियमितपणा असलेले, मोठे, सुसंघटित अक्षर; आत्मविश्वास, स्वतःला उत्तमरीत्या व्यक्त करता येणे, उत्साह, चैतन्य आणि कामसुपणा असलेले व्यक्तिमत्त्व दाखवते.

हेच मोठे अक्षर जर अनियमित असेल तर उद्धटपणा, तुटक स्वभाव, असभ्य बोलणं आणि मन मानेल तसं वागणारी व्यक्ती म्हणून व्यक्तीचित्र रेखाटते.

Graphology
Regularity in Handwriting

 

Regularity in Handwriting:

हे sample regularity चं एक उदाहरण म्हणून आपण पाहू शकतो. हे google वरून घेतलेलं sample आहे.

कागदाकडे पहाताचक्षणी आपल्याला एकंदर नियमितपणा लक्षात येतोच. ज्याच्या हस्ताक्षरामध्ये सुसंगती आणि निश्चीतपणा असतो, एकसारखं लिहिण्याचं सातत्य असतं, त्या व्यक्तीमध्ये विचार आणि वागण्यामध्ये निश्चितता दिसते. त्यांच्या चालण्यामध्ये आत्मविश्वास जाणवतो. बोलण्यामध्ये सुसंगतता असते. जर त्या व्यक्तीने लिहायला पेन उचलला तर, अक्षरात एक स्थिरता दिसते. सगळीच अक्षर एकसारखी, टंकलेखन केल्यासारखी नक्कीच नसतील, पण एक तुलनात्मक नियमितपणा आपोआपच जाणवेल.

Regularity ही अनेक गोष्टींमधून दिसते. काही खाली नमूद करत आहे.

  1. पानाच्या चारही बाजुंनी समतोल समास सोडलेला असतो.
  2. Capital आणि small (lower case) अक्षरं ही एकमेकांना शोभतील अश्या प्रमाणात असतात.
  3. संपूर्ण पानाकडे पाहता, अक्षरांचा झुकलेला कल (slant) सुसंगत, वारंवार न बदलणारा असतो.
  4. बऱ्याचशा अक्षरांची उंची मिळती जुळती असते.

एकंदर लेखनाकडे पहाता हस्ताक्षर साधं, समजण्यास सोपं, कुठलीही गुंतागुंत नसलेलं, वाचण्यायोग्य, आणि स्पष्ट व स्वच्छ असेल तर त्यातून नियमितपणा दिसतो. अक्षरांची आखणी उत्तम असेल तर दृष्टीलाही आणि माणूसाचा सहवासही सुखकारक असतो.

Regularity आणि बाकीच्या उत्तम गुणांची एकत्रित मांडणी करता एक मस्त स्वभाव समजून घेता येतो. त्या व्यक्तीमध्ये एक अंतःस्थ स्थिरता जाणवते. सगळीकडेच.. विचारात, भावनांमध्ये आणि कामातही.. अश्या अक्षराचे लोक विश्वसनीय असू शकतात. त्यांच्या व्यक्त होण्याच्या पद्धतीमध्ये अनावश्यक बदल जाणवणार नाहीत.

Irregularity in Handwriting:

हे sample irregularity चं एक उदाहरण म्हणून आपण पाहू शकतो. हे google वरून घेतलेलं sample आहे.

Irregular हस्ताक्षर:

Handwriting Analysis
Irregularity in Handwriting
  1. समास असमतोल, एकसारखा नसलेला,
  2. capital आणि lower case अक्षरांचा ताळमेळ नाही. काही लहान काही मोठी.
  3. हस्ताक्षरात विसंगती.
  4. (Slant) भरपूर पुढे मागे होणारी अक्षरं
  5. ओळींमधील अंतर असमान
  6. अक्षरांची उंची कमी जास्त

एकंदर regularity च्या पूर्णपणे विरुद्ध असलेलं अक्षर!

या प्रकारच्या लिहिण्यातून समजतं की लेखक धरसोड वृत्तीचा आहे. स्वतःच्या मतांवर हा ठाम नसतो. अनिश्चित. विचार आणि भावना बदलत रहाण्याची शक्यता जास्त असते. गोंधळलेली व्यक्ती. या व्यक्तींना स्पष्टता नसते. या लोकांनी स्वतःला शिस्त लावलेली नसते आणि आयुष्याचं गणितच ते कदाचित चुकीच्या दृष्टिकोनातून मांडतात.

साचेबद्ध अक्षर

अति एकसारखं, साचेबद्ध अक्षर:

हे sample साचेबद्ध लिखाणाचं एक उदाहरण म्हणून आपण पाहू शकतो. हे google वरून घेतलेलं sample आहे.

वर नमूद केल्यापैकी जर रेगुलरीटी/ नियमितपणा असलेल्या हस्ताक्षराच्या सर्वच गोष्टी सातत्याने लागू होत असतील तर ते अति शिस्तबद्ध हस्ताक्षर असते. आपण लावलेला स्वभावाचा अर्थ खरा असेलच याची शक्यता कमी. खूप जास्त एकसारखेपणा आणि अनैसर्गिकपणे दिसणार समान अक्षर हे प्रविण्यानी मिळवता येतं. अश्या लोकांना परिस्थितीशी जुळवून घेताना कमी त्रास होतो आणि spontaneity असते असं ते जगासमोर मांडतात. शक्यतो तो एक प्रकारचा makeup असण्याची शक्यता जास्त असते.

Handwriting Analysis

मी वर सांगितलेल्या स्वभाव विश्लेषणांमध्ये काही त्रुटी असलेले स्वभाव तर काही चांगले गुण असलेले स्वभाव कसे ओळखावे हे सांगितलं आहे. पण हस्ताक्षरावरून व्यक्तीला समजून घेताना हे लक्षत ठेवणं गरजेचं आहे की, प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळ्या वातावरणात वाढलेली असते. त्या व्यक्तीला येणाऱ्या अनुभवांमधून ती घडत जाते. बालपणातल्या, तरुण्यातल्या आणि पुढे येत जाणाऱ्या अनुभवांमधून आपण स्वतःला बदलत जातो. जगाशी वागण्याच्या पद्धती आपण बदलतो.. कदाचित मन मानत नसेल पण अनुभवांनी शिकवलं असेल म्हणून आपण ठराविक पद्धतीने react होतो. त्यामुळे हस्ताक्षरावरून labeling करण्यापेक्षा माणूस म्हणून भावना समजून घेणं महत्वाचं. वरच्या मार्गदर्शनावरून स्वतःच्या भावना समजून घ्या आणि इतरांनाही समजून घ्या. आपण कुणालाही वाईट पटकन म्हणू शकतो पण ती व्यक्ती वागण्यामागचं करण समजून घेतलत,संवाद साधला तर माझ्या या लेखाचा उपयोग झाला असं मला वाटेल. सध्या आपल्याला या technology च्या जगात, ‘माणसांनी माणसाच्या भावना समजून घेण्यासाठी’ “संवाद” हा एकच उत्तम मार्ग आहे. त्यासाठीचं हस्ताक्षरविज्ञान (graphology) या विषयावर मी लेख लोहितीये. याचा तुम्हाला उपयोग होईल ही अपेक्षा. 

माझ्या लेखांचा तुम्हाला उपयोग झाल्यास नक्की Reply द्या. माझ्याशी संवाद साधा. प्रश्न विचारा.. मला नक्कीच आवडेल.

 Reference:

Hayes Reed C,  1993; Between the lines: understanding yourself & others through Handwriting analysis; Basics of handwriting analysis.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu